25.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeलातूरवाहनांसह १५ लाखांचा गुटखा जप्त आरोपी मात्र फरार

वाहनांसह १५ लाखांचा गुटखा जप्त आरोपी मात्र फरार

उदगीर : प्रतिनिधी

उदगीर येथे केलेल्या कारवाईत वाहनांसह १५ लाख २७ हजार रुपयांचा अवैध गुटखा व अन्य ऐवज जप्त करण्यात आला असून यातील आरोपी मात्र फरार झाले आहेत. या प्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही गितांजली, सागर, नजर गुटखा प्रतिबंधीत अन्न पदार्थ वाहतूक व विक्री प्रकरणी उदगीरच्या तिघाविरोधात उदगीरच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून ५, २७, ००० रुपये व दोन वाहने अंदाजेकिंमत १०,००,००० रुपये असा एकून १५,२७, ००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींकडे पान मसाला, गुटख्याचा साठा आढळून आला. या प्रकरणी अन्न सूरक्षा अधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविल्या त्यानंतर अन्न भेसळ अधिकारी यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अजहर पटेल , हमीद पटेल, जफर पटेल सर्व रा.मदिना नगर आयशा कॉलनी उदगीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. आरोपी विरुद्घ गुरनं ३४६ /२०२३ कलम १८८,२७२, २७३, ३२८, ३४ भादवी व अन्न सूरक्षा व मानदे कायदा -२००६ कलम ५९. नूसार अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आधिक तपास मपोउपनि जाधव हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी हाती न लागल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR