25.8 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeलातूरवाहनासह १८ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

वाहनासह १८ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

 लातूर : प्रतिनिधी
मे महिन्याच्या सुरूवाती पासून अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये वरिष्ठांच्या माग्दर्शनात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दि. २३ मे रोजी पोलीस ठाणे किनगाव पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वाहनासह १८ लाख ७२ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून ३ व्यक्त विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी किनगाव येथील काही इसम प्रतिबंधित गुटखा साठवून करून अवैध विक्री व्यवसाय करीत आहे अशी माहिती मिळाली. सदर माहितीवरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात दिनांक २३ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांचे नेतृत्वातील पथकाने कार्यवाही करत किनगाव येथील एका फर्निचरच्या दुकानाच्या पाठीमागील गोडाऊन मध्ये छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला ११ लाख ७२ हजार ८६० रुपयांचा गुटखा व एक  ७ लाख रुपयेचा पिकअप वाहन असा एकूण १८ लाख ७२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठा व विक्री करीत असताना मिळून आलेला इसम नामे शहबाज शेख रा. किनगाव,गोविंद उदरे रा. किनगाव, संतोष फड, रा. सौंदाना ता. परळी जिल्हा बीड यांचे विरुद्ध पोलीस ठाणे किनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात, किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ शिरसाठ पोलीस अमलदार महादेव दहिफळे, अनिल इस्टाळकर, सुरज कोतवाड, शिवाजी गोरे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR