17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरविकसित भारत संकल्प यात्रा पोहचली लातूर जिल्ह्यात

विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली लातूर जिल्ह्यात

लातूर : प्रतिनिधी
शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम २४ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जाईल. यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि शहरी भागासाठी नगर विकास विभाग समन्वयक म्हणून काम करणार आहेत. या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिकेपर्यंत सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

या यात्रेच्या रथांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगर विकास विभागाचे सहआयक्त रामदास कोकरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, नियोजन विभागाचे सहायक नियोजन अधिकारी शंकर साबरे, वामन जाधव, माहिती आणि प्रसारण विभागाचे अधिकारी अंबादास यादव उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत या योजना पोहचविणे, या योजनाच्या माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागृती निर्माण करणे, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व सूचना जाणून घेणे हे या विकसित भारत संकल्प यात्रेचा मुळ उद्देश आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून ही समितीचे सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आहेत. तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत. या समिती मध्ये महानगरपालिका आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी इत्यादी अधिकारी सदस्य आहेत. यात्रा कुठे कुठे जाणार आहे याचे ग्रामीण भागाचे नियोजन जिल्हा परिषदेने केले असून शहराचे नियोजन नगर विकास विभागाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR