23.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeलातूरविकासाची दृष्टी असणा-या काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहा

विकासाची दृष्टी असणा-या काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहा

लातूर : प्रतिनिधी
अलीकडे राजकारण बदललेले असून मात्र सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस पक्षाचा विचार आहे या पक्षाने विविध समाज घटकांना नेतृत्व करण्याची संधी दिली मात्र अलीकडे समाजात ध्रुवीकरण करण्याचे काम सुरु असून हा डाव जनतेने ओळखून विकासासाठी दृष्टी असणा-यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे त्यासाठी येणा-या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज देशमुख यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
रेणापूर तालुक्यांतील पानगाव येथे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज देशमुख यांच्या प्रचारार्थ संवाद बैठकीचे आयोजन आयोजन  करण्यात आले होते. त्यावेळीं ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, आबासाहेब पाटील, व्यंकटराव चव्हाण, विश्वास देशमुख, प्रभाकर केंद्रे, चंद्रचूड चव्हाण, अजमुद्दिन मनियार, चंद्रकांत आरडले, सिद्धेश्वर गालफाडे, शिवाजी आचार्य, बहुरान हनोदे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील अन्याय दूर करण्यासाठी स्थिर सरकार निवडून आणणे गरजेचे असून सध्या सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने मात्र स्वत:ची खुर्ची सांभाळण्यासाठी जनतेला मात्र वा-यावर सोडण्याचे काम केले.
खोटी आश्वासने भूलथापा वेगवेगळ्या घोषणा देऊन लोकांना अमिष दाखवण्याचे प्रकार या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे वेळीच ओळखले पाहिजे, असे सांगून येणा-या काळात आपल्या सर्वांची मदत घेऊन सर्वसामान्यांची बाजू घेऊन आपण लढू जनतेच्या प्रश्नांना साथ देऊन त्यांचे स्थानिक प्रश्न सोडवू आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न आमचा राहील यासाठी आपण काँग्रेस आघाडीचे उमेदवार धिरज विलासराव  देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या भागातून अधिक  मताधिक्य द्यावे, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.  यावेळी धनराज देशमुख, शिवाजी आचार्य, हनुमंतराव चव्हाण, उत्तरेश्वर हलकुडे, बाळकृष्ण माने, श्रीनिवास दत्तात्रय रामबोळे, संभाजी रेड्डी तसेच रेणा साखर कारखान्याचे संचालक, रेणापूर बाजार समितीचे संचालक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पानगाव परिसरातील मतदार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR