16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरविद्यार्थ्यांनी पालकांनी वाचन संस्कृती वाढवण्याची नितांत गरज

विद्यार्थ्यांनी पालकांनी वाचन संस्कृती वाढवण्याची नितांत गरज

लातूर : प्रतिनिधी
पुस्तके हेच संस्कार करण्याचे प्रभावी साधन असून तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी पालकांनी वेळेचा सदुपयोग करून वाचन संस्कृती वाढवण्याची नितांत गरज आहे. शैक्षणिक धोरण आणि पालकांचे धोरण यात सांगड असायाला हवी. शिक्षण व्यवस्थेत धोरण नाही, तर सिस्टीम बदलणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते डॉ. संजय कळमकर यांनी केले.
सन्मित्र दिलीप शेटे स्मृती व्याख्यानमाला अंतर्गत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आणि नेटीझन्स फाउंडेशनच्या वतीने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आनंदाने शिका-आनंदासाठी शिकवा’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत हाते. समारंभाच्या अध्यक्षस्थानीअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष देविदास बस्वदे हे होते. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कचरूआण्णा शेटे, परमेश्वर बालकुंदे, कल्याण लवांडे, माणिक गंगापुरे, श्रीमती सविता शेटे, डॉ. माधव लोहारे यांची उपस्थिती होती.
या समारंभाचे प्रास्ताविक सुनिल हाके यांनी केले. तर व्याख्यानाची भूमिका प्रा. सुधाकर तोडकर यांनी मांडली. समारंभाच्या यशस्वितेसाठी प्रा. महेश तोडकर, संतोष लोहारे, सुनील बिराजदार, शशिकांत थळकरी, बाळासाहेब हरड, अनिल हुलगे, वेदप्रकाश भोसले, अक्षर शेटे, ओम नागुरे, बंकट जाधव, सुनंदा कोरे, वेंकटेश रेड्डी, मनोज चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR