उदगीर : प्रतिनिधी
विवाह व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाचा असतो. परंतु विवाह पेक्षाही राष्ट्र मोठे असतेच याचा प्रत्यय उदगीर तालुक्यातील नळगीर येथील स्वप्निल गायकवाड यांनी रविवारी होणारा विवाह सोहळा रद्द करून हाळदीच्या दिवशीच देश सेवेसाठी रुजू झाला. देशभक्तीचा असाही प्रत्यय या सैनिकांमुळे आला आहे.
उदगीर तालुक्यातील नळगीर येथील स्वप्निल गायकवाड यांचा विवाह सपना यांच्यासोबत रविवार दि. ११ मे रोजी होणार होता. स्वप्निल गायकवाड हे श्रीनगर जम्मूकाश्मिर येथे सिआरपिएफ मध्ये कार्यरत असलेल्यास्वप्निल यांना दि. ८ मे रोजी पासुन विवाहसाठी सुट्टी मंजूर झाली. परंतू भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वप्निल यांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश आले आणि स्वप्निल गायकवाड यांनी ठरलेला विवाह रद्द करत कर्तव्यावर रुजू झाले.
विवाह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक सुवर्ण दिवस असतो. परंतु स्वत:च्या विवाह पेक्षा देश महत्त्वाचा असतो. देशभक्ती महत्त्वाची असते. त्यामुळे विवाह रद्द करत कर्तव्यावर रुजू झाले. उदगीर तालुक्यातील नळगीर येथिल शारदा अशोक गायकवाड यांचा मुलगा स्वप्निल यांचा विवाह धामणगाव तालुका जळकोट येथील अर्चना प्रशांत तोगरे यांची कन्या सपना यांच्यासोबत रविवार दि. ११ मे रोजी नळगीर येथे मोठ्या थाटात संपन्न होणार होता. विवाहच्या पत्रिका वाटल्या गेल्या विवाहासाठी वाजंत्री नेमले गेले. विवाहाचा बस्ता बांधला गेला, पाहुण्यांसाठी भोजनासाठी लागणा-या अन्नधान्याची व्यवस्था केली गेली. मंडप ही सांगितला गेला. नवरीचे दागीने मडवले. परंतु भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वप्निल यांची सुट्टी रद्द झाली. व कर्तव्यावर रुजू होण्याची आदेश आले आणि विवाह पेक्षा देश महत्त्वाचा असल्याने विवाह रद्द करत कर्तव्यावर रुजू झाले. अभिमानास्पीद कार्याबदल नळगीर ग्रामस्थासह तालूक्यातील नागरीकांतून कौतूक होत आहे.