लातूर : प्रतिनिधी
लातूर भाजीपाला बाजारात शुक्रवारी रोजी पासून अचानक ५-१० रुपयाची कोंिथबीर ची गड्डी २०-२५ रुपये, तर ४०-६० रुपये किलोचा हिरवा भाजीपाला ८०-१०० रुपये किलो प्रमाणे विक्री झाल्यानें बाजारकरुना आर्थिक फटका बसला असल्याचे चित्र आहे. वर्ष-२०२३-२४ या आर्थिक वर्षातक जेमतेम नाममात्र पाऊस झाला. पावसाने गतवर्षांची सरासरी ओलांडली नाही तर नदी नाले तलाव पुर्ण क्षमतेने भरली नव्हती होती.
त्यात मध्यांतरी परतीच्या पावसाने थोडा दिलासा दिला. झालेल्या पावसाने नदी नाले तलाव विहिरीना जेमतेम पाणी आले. त्यात यंदा मरणाचा कडक उन्ह उष्णता उकडा दमटपणा त्यामुळे ही हवामानात बदल होवून पाणी गायब झाले तर सद्या विहिरींनी तलावांनी तळ गाठला आहे. तर बहुतेक विहिरी कोरड्या पडल्याने परिणामी बाजारात पाले भाज्यांची आवक घटली असून परिणामी बाजारात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.