24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरवृक्ष लागवड ही लोक चळवळ व्हावी

वृक्ष लागवड ही लोक चळवळ व्हावी

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असून त्यासाठी लोक सहभाग महत्वाचा आहे. वृक्ष लागवड ही लोक चळवळ होणे गरजेचे असून वृक्ष लागवडीसोबत आदर्श ग्राम असलेल्या आनंदवाडीने बांबु लागवड मध्ये ही आदर्श निर्माण करावा, असे आवाहन लाूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून लोकसंख्याच्या दुप्पट वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने आनंदवाडी येथे ५ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, तहसीलदार गोंिवदराव पेदेवाड, गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, एबीडीओ शिवाजी यमुलवाड, सरपंच भागवत वंगे, उपसरपंच व्यंकट कल्ले, ग्रामसेवक संजय रोडेवाड उपस्थित होते.
माझं लातूर हरित लातूर या उपक्रमा अंतर्गत आनंदवाडी ग्रामपंचायत मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून गावात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आले असून त्यांना ट्री गार्ड लावण्यात आल्याने सरपंच व ग्रामस्थांचे विशेष कौतुक करून येणा-या काळात या सर्व वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे  असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे ही अनमोल सागर यांनी सांगितले.  प्रास्ताविकातून गावांत मोठया प्रमाणात विकास कामे झाली, त्यात नागरिकांचे सहकार्य लाभले, आता गावांत ५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत आपल्याकडून निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रात आनंदाचा शिधा दिला असून आता सरपंच सन्मान योजना देखील राबविणार असल्याचे सरपंच भागवत वंगे यांनी सांगितले.   कार्यकृमाचे सुत्रसंचालन रमेश सोनवणे व प्रा. महताब शेख यांनी तर आभार प्रा. शिरीष दिवेकर यांनी मानले.
यावेळी तालुका कृषि अधिकारी लक्ष्मण खताळ, पं.स.अमोल गायकवाड, गट शिक्षणाधिकारी अनिल पागे, केंद्र प्रमुख बालाजी बिडवे, व्यंकटेश मंडावले, अनिल मिरकले, अनवर शेख, ज्ञानोबा शिरूरे, परमेश्वर तोंडारे, सतीश नरहरे, श्रीधर कोल्हे, संदिपान वंगे, नामदेव दिवेकर, ज्ञानोबा शेळके, बळवंत शिरूरे, राजु दिवेकर, वामन शिरूरे, बाबुराव धुळे, नरंिसग खरटमोल यांसह अनेक गावचे सरपंच, गावांतील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR