19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमुख्य बातम्यावैचारीक लढाईवर भर : शरद पवार हार मानण्यास नकार, नव्या वादळाची नांदी

वैचारीक लढाईवर भर : शरद पवार हार मानण्यास नकार, नव्या वादळाची नांदी

कराड : प्रतिनिधी
शरद पवार यांनी हार मानण्यास नकार दिला आहे. मी घरी बसणारा नाही, असा निर्धारच त्यांनी बोलून दाखवला. त्यांच्यातील हे फाईटिंग स्पिरिट भल्याभल्यांना अचंबित करणारच नाही, तर एका वादळाची नांदी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

शनिवारी निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील.’ असा दुर्दम्य आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेने आता राष्ट्रवादीत पुन्हा नवीन उत्साह संचारला आहे.

कुणी तरी बारामतीत उभं राहणं आवश्यक होतं. तिथं कुणालाही उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात मेसेज काय गेला असता. दोघांची तुलना होऊ शकत नाही हे आम्हाला माहीत होतं. अजित पवार यांचं अनेक वर्षापासूनचं राजकारण, सत्तेतील सहभाग आणि दुस-या बाजूला नवखा तरुण हे आम्हाला माहीत आहे, असे उत्तर त्यांनी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्या लढतीवर दिले. सकाळी अजितदादा या मुद्यावर भावनिक झाले होते.

आमच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. त्यांचे विचार आहेत. त्या विचाराने काम करणारा मोठा वर्ग भाजपसोबत आहे. आमच्यातून बाहेर गेलेल्या लोकांनी निवडणुका लढविल्या त्यांना यश मिळालं. त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर चव्हाण साहेब किंवा गांधी, नेहरूंच्या विचाराने काम करणारे होते. पण त्यांनी संपर्क आणि सहयोग भाजपसोबत ठेवला हे नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधीही त्यांनी त्या काळातील जनसंघ आणि भाजपशी संबंध ठेवला नाही. त्यांनी त्यांच्याशी शेवटपर्यंत वैचारिक अंतर ठेवलं, हे त्यांनी ठासून सांगितले. त्यामुळे येत्या काळात वैचारिक लढाईवर मोठा जोर असणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR