लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी ता. लातूर या कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख आणि सर्व संचालकांनी कारखाना कार्यक्षेत्रातील तोडणी होत असलेला ऊसाची पाहणी केली. कारखान्याचे सभासदांशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
विलास कारखान्याचा गळीत हंगाम (२०२४-२५) सुरळीतपणे सुरु आहे. या गळीत हंगामात प्राधान्याने कार्यक्षेत्रातील ऊसाची तोडणी होत आहे. या सुरु असलेल्या हंगामातील गाळप झालेल्या उसाला उस बीलापोटी ऊसउत्पादक शेतक-यांना प्रति मेट्रिक टन २७०० रुपयांप्रमाणे ऊस बिलाचा पहीला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. अंतीम ऊसदर किमान प्रतिटन ३ हजार रुपये राहणार आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील काटगाव येथे विशाल अंकूश बोळे, जवळा (बू) येथे इंदुबाई महालींग चौंडे, वांजरखेडा येथे शामसुंदर वैजीनाथ कदम, गादवड येथे विनायक प्रल्हाद कदम तर तांदूळजा येथे रामानंद गुरुनाथ पाटील यांच्या तोडणी होत असलेल्या ऊसप्लॉटची जाऊन पाहणी केली.
यावेळी तोडणी होत असलेला ऊस तसेच या भागात लागवड ऊसाची सदयाची परिस्थिती याबाबत कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादकांशी यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, संचालक गोविंद बोराडे, संचालक अनंत बारबोले, संचालक भैरवनाथ सवासे, संचालक रणजीत पाटील, गोवर्धन मोरे, मदन भिसे, बप्पा लोमटे, अरुण कापरे, श्याम शास्त्री, दैवशाला राजमाने, बंकट कदम, संचालक शाहूराज पवार, पंडित कदम, विनोद माने, सुहास कदम, सिद्धेश्वर राडकर, माणिक बोळे, राजकुमार पल्लोड, पाशा पठाण, लोखंडे, माचवे, अमोल भिसे, बाळासाहेब माने, संजय शिंदे, गायकवाड, शिवाजी बावणे, प्रशांत दयाळ, गुरुनाथ पाटील, दत्तात्रय बनाळे, बलभीम शिंदे, संजय चव्हाण, जयचंद भिसे आदी उपस्थित होते.