22.1 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeशरद पवार राजकारणातून संन्यास घेणार?

शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार?

 

बारामती : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल”, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तरच सरकारचा दृष्टीकोण चांगला राहतो. दुर्देवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

“मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही”, असे शरद पवार म्हणाले.

मी सत्तेत नाही. राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत १४ निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे”, असे विधान शरद पवारांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR