15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद

शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद

दिंडोरी : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाला ख-या अर्थाने सुरुवात झाली आहे. आजपासून महाराष्ट्र विधानसभेसाठी अर्ज भरले जाणार आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अशातच शरद पवार यांचा मला दुरुन आशिर्वाद आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी गरुवारी २४ ऑक्टोबर रोजी आपला विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दिंडोरीतून सलग तिस-यांदा नरहरी झिरवाळ विधानसभेच्या मैदानात उतरत आहेत. पक्षातील काही प्रमुख पदाधिका-यांसह नरहरी झिरवळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत एक महत्वाचे विधान केले. राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद राहणार.. असे ते म्हणालेत. झिरवळ यांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

दुसरीकडे दिंडोरीत महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने नरहरी झिरवळ यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. दिंडोरीमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते धनराज महाले हे विधानसभा मतदारसंघात इच्छुक होते मात्र ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याने महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते दिंडोरीमधून अपक्ष निवडणूक लढवणर आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR