28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांशी भेट घेतली नाही

शरद पवारांशी भेट घेतली नाही

अहमदनगर : अजित पवारांसोबत असलेले राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवारांची पुण्यात भेट घेतल्याचंही बोललं गेलं, पण आपण शरद पवारांची भेट घेतली नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं आहे, पण अमोल कोल्हे यांची भेट झाल्याचं निलेश लंके यांनी मान्य केलं आहे.

‘माझी आणि शरद पवारांची भेट झालेली नाही. अमोल कोल्हे शिरुरला आले होते, त्याठिकाणी आमची भेट झाली. अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य आयोजित केलं होतं, त्यावर आमची चर्चा झाली आहे, मात्र राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी शरद पवार आणि माझी भेट झाली नाही, तसेच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय झालेला नाही,’ असं निलेश लंके म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR