21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरशस्त्राचा धाक दाखवून दारूचा ट्रक लुटणारे जेरबंद

शस्त्राचा धाक दाखवून दारूचा ट्रक लुटणारे जेरबंद

लातूर : प्रतिनिधी
नागपूर-तुळजापूर महामार्गावरील आष्टा येथील टोलनाक्याजवळ दि. १२ मे रोजी मध्यरात्री दोन वाहनातून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून विदेशी मद्याची वाहतूक करणा-या कंपनीचा ट्रक मध्ये बसलेल्या चालक व हेल्पर इतर दोन व्यक्तींना मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. ट्रक चालकाने दिलेल्या फिर्याद वरून पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ७२ लाख रूपयांच्या मुद्देमालासह चौघांना अटक केली आहे.
सदर प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे चाकूर येथील पोलीस अधिकारी अमलदारांचे विविध पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देऊन विविध ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बीड, धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे तपास करून सदर पद्धतीचे गुन्हे करणा-या सराईत आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस करून, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला विदेशी दारूचे ९०० बॉक्स व ट्रक असा ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रियाज सौदागर, राजेश कंचे, योगेश गायकवाड, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, रामहरी भोसले, मनोज खोसे, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, दीनानाथ देवकते, रवी गोंदकर, तुराब पठाण, नितीन कटारे,मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, चालक पोलिस अमलदार नकुल पाटील, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, व्यंकट निटुरे, सायबर सेल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे, पोलिस अमलदार संतोष देवडे,
गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR