36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रशाळेच्या ताब्यासाठी दोन गटांत तुफान राडा

शाळेच्या ताब्यासाठी दोन गटांत तुफान राडा

कल्याण : शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेच्या प्रांगणात गोंधळ, शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडणे व दगडफेक असे प्रकार घडले आहेत. कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाच्या ताब्यासाठी दोन गटांत बेदम मारहाण झाली.
व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. व्यवस्थापकाला दांडक्याने मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शांती हिंदी विद्यालयाच्या ताब्यासाठी संस्थेमधील दोन गटाच्या वादातून तुफान राडा झाला. शाळेच्या मैदानातच व्यवस्थापकांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ५ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली होती.

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाचे संस्थेचे स्वयंसेवक व केअरटेकर म्हणून विवेक श्रीकांत पांडे काम करत होते. या वेळी शाळेचे आधीच्या संस्थेत असलेले विनोद पांडे, गगन जैस्वार, नीतू पांडे, श्वेता पांडे, सुषमा पांडे आपल्या इतर साथीदारांसह शाळेच्या ग्राऊंडमध्ये आले. त्यांनी विवेक पांडे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर तोंडाला काळे लावून एका खोलीत डांबून ठेवले. या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा तिवारी यांनीही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या जबाबानुसार विवेक पांडे व इतरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांचे कपडे फाडून लज्जास्पद कृत्य केले आणि ७ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले.

त्यांच्यासह अनेक महिलांनी शाळेच्या आवारात शिवीगाळ, आरडाओरडा केला. तसेच दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही संस्थेच्या १५ ते २० जणांवर जबरी चोरीसह अनेक कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR