चाकूर : प्रतिनिधी
तालूक्यातील भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचीत लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ व विविध प्रकारचे दाखल्याचे वाटप शिबिर शासन आपल्या दारी उपक्रमातंर्गत तालुक्यातील पाच महसुल मंडळातील बोथी तांडा, हणमंतवाडी तांडा, देवनगर तांडा (जानवळ), सेवापूर तांडा (आष्टा) व झरी खु या पाच गावात आयोजीत करण्यांत आले होते. हे शिबीर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर -घुगे, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे , चाकूरचे तहसिलदार नरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते.
या शिबीरात वंचीत लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला, रहीवाशी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, बँक सेवा, आयुष्यमानकार्ड, आभा कार्ड, अॅग्रीस्टॅक नोंदणी, शिधापत्रीका संबंधी कामे, आधार कार्ड संबंधी कामे, शेतकरी अनुदान ईकेवायसी (एङउ), शिधापत्रीका ईकेवायसी , संगायो/इंगायो सेवा अश्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली आणि तेही गावातील वाडी/तांड्यावर जाऊन देण्याचे काम या शिबिरात करण्यात आले असल्याने शासन आपल्या दारी या उपक्रमाचे जनतेने स्वागत केले आहे. या उपक्रमासाठी महसुल विभागाचे संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी, ग्रामविकास विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी व त्यांचे कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकान चालक, महा ई सेवा केंद्र व सीएससी केंद्र चालक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मतदार नोंदणी अधिकारी आदी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.