परभणी : शेर-ए-पंजाब, शाही इमाम मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांचे दि.२६ जानेवारी रोजी परभणी येथे आगमन होणार आहे. मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांच्या आगमनानिमित्त अल-खैर फाउंडेशन परभणीच्या देखरेखीखाली दोन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पहिला कार्यक्रम सकाळी १० वाजता इफ्तिखार पार्क, धार रोड परभणी येथे होईल. ही बैठक विशेषत: उलेमा, वकील, शिक्षक आणि इतर बुद्धिजीवींसाठी ठेवण्यात आली आहे. दुसरा कार्यक्रम साधी सभा स्वरूपात जुन्या ईदगाह मैदान, जिंतूर रोड परभणी येथे संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला जाईल. या भव्य जनसभेचा विषय वक्फ आणि लोकशाहीचे संरक्षण असा आहे.
या जनसभेचे अध्यक्षपद मौलाना कलंदर खान नदवी (परभणी) भूषवतील. कार्यक्रमाची देखरेख मौलाना शेख शाहिद अशरफी करतील. या कार्यक्रमात मौलाना उस्मान रहमानी यांचे महत्त्वपूर्ण भाषण होणार आहे. तसेच स्थानिक वक्ते म्हणून काझी-ए-शरियत मुफ्ती मोहम्मद सईद अनवर कासमी (इमाम, मशीद-ए- इद्रुसियाह, परभणी) यांचेही भाषण होईल.
सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त मुस्लीम समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुफ्ती शेख तल्हा अशरफी, मुफ्ती शेख साजिद नदवी, आणि अल-खैर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.