22.9 C
Latur
Monday, December 30, 2024
Homeमहाराष्ट्रशिर्डीत सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन

शिर्डीत सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन

पुणे : प्रतिनिधी
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रैवार्षिक अधिवेशन दि. २१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असून अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातून सुमारे १५०० सहकार भारतीचे क्रियाशील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे, राष्ट्रीय प्रकाशन प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितली.

अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे तसेच आर. बी. आय. संचालक सतीश मराठे उपस्थित राहणार आहेत. महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब गोडबोले यांच्या नावाचा पुरस्कार सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांना जाहीर झाला आहे. अधिवेशनस्थळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अधिवेशनात प्रदेशाची पुढील ३ वर्षांसाठीची नवीन कार्यकारिणी निवडली जाणार आहे. सहकार चळवळीत बिना संस्कार नही सहकार हे ब्रीद घेऊन सहकार भारती १९७८ पासून कार्यरत असून देशभरात सर्वत्र सहकाराच्या शुद्धी आणि वृध्दीसाठी असंख्य कार्यकर्ते काम करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR