25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरशेतक-यांच्या घामाला मिळेना दाम, शेतकरी आर्थिक संकटात

शेतक-यांच्या घामाला मिळेना दाम, शेतकरी आर्थिक संकटात

लातूर : प्रतिनिधी
अगोदर नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊसाने कंबरडे मोडले असताना आता भाजीपाल्याचे दर कोसळत चालले आहेत, याचा मोठा फटका हा शेतक-यांना बसताना दिसून येत आहे.  उत्पादक शेतक-यांना पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे. टोमॅटो १० ते १५ रुपये किलो तर कांद्याला १० ते १२ रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत. सर्वच भाज्या १० ते १५ रुपये किलोच्या घरात विकल्या जात असल्यामुळे भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
सर्वत्र दर वाढत आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले मात्र भाज्यांच्या घसरलेल्या दरांनी शेतक-यांचे अर्थकारण पार कोलमडून गेले आहे. टोमॅटोसह पालेभाज्यांचे पीक अक्षरशा नष्ट करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यातच वाढलेला वाहतूक खर्च आणि मिळणारा बाजारभाव यांच्या चक्रात शेतकरी पार गुरफटून गेला आहे. कमी दर मिळत असल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चही निघत नाही. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-यांची घोर निराशा केली आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली आहे.
 काही महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव पडलेले होते. ते स्थिर होण्यासाठी बराच वेळ  लागला होता. मात्र आता रोज कांद्याचे भाव पडत आहेत. काही दिवसापूर्वी ६० किलोच्या कट्याला ४०० ते ६०० रुपये भाव होता तो आता १५० ते २०० रुपयावर आला आहे. लग्न सराईमध्ये कांद्याला भाव येईल ही आशा ही आता धुळीला मिळाली आहे. त्याबरोबरच भाजीपाल्याची आवक दिवसंदिवस कमी होत चाल्याचे चित्र सध्या शहरातील बाजारात दिसून येत आहे.मेथी, पालक, वांगे गवार, दोडके यांच्याबरोबर इतर भाजीपाल्याची आवक दिवसंदिवस कमी होत असल्यामुळे सध्या भाव स्थिर असल्याचे व्यापारी मिनाझ बागवान यांनी सागीतले आहे. शहरातील भाजी मंडईत एका ही भाजीला २० रुपयांच्या पुढे भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
शहरातील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक प्रति दहा किलोत वागें ३७ क्विंटलपर्यंत आवक होऊन सर्वसाधारण भाव ८० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. दोडका १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन भाव ३०० रूपये, भेंडि १२ क्विंटलपर्यंत आवक होऊन २३० रुपये भाव, पत्तागोबी १०५ क्विंटललपर्यंत आवक होऊन ८० रुपये, फुलगोबी ८३ क्विंटलपर्यंत आवक होऊन १०० रुपये, गावरान टमाटे ८० क्विंटलपर्यंत आवक होऊन १४० रुपये, वैशाली टमाटे १५१ क्विंटलपर्यंत आवक होऊन १४० रुपये, गवार शेंगा ०३ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० रुपये, पालक २ क्विंटलपर्यंत आवक होऊन ६० रुपये, गाजर ४१ क्विंटलपर्यंत आवक होऊन ४० रुपये, शेपू १ किंव्टलपर्यंत आवक होऊन ८० रूपये, भोपळा १५ किंव्टलपर्यंत ६० रूपये, कोंथीबीर २४ किंव्टलपर्यंत आवक होऊन १२० रूपये, हिरव्या मिरची ८९ किंव्टलपर्यंत आवक होऊन ४२० रूपये, वैशाली मिरची ४२ किंव्टलपर्यंत आवक होऊन २८० रूपये, वरणा ३९ क्विंटलपर्यंत आवक होऊन ८० रुपये, वटाना ६८ क्विंटलपर्यंत आवक होऊन ३४० रुपये, शेवगा १७ किंव्टलपर्यंत आवक होऊन ५०० रुपये, मेथी २३ किंव्टलपर्यंत आवक होऊन ३०० रुपये, कांदा पात ४ क्विंटलपर्यंत आवक होऊन ३०० रुपये,लिंबू १ किंव्टलपर्यंत आवक होऊन ३४० रुपये, काकडी ९३ किवंटलपर्यंत आवक होऊन १२० रुपये, कारले ८ क्विंटलपर्यंत आवक होउन २४० रुपयापर्यंत प्रति दहा किलाकला दर मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR