पोहरेगाव : वार्ताहर
तालुक्यातील भोकरंबा, मोटेगाव आणि मोरवड परिसरात शनिवरी २० (आक्टॉबर) मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या ढगफुटीने परिसरात नाल्याना पाणी आल्याने साधारण दीड-दोन हजार सोयाबीनचे क्षेत्रातील गंजी पाण्याखाली गेल्या आहेत. शेतक-याच्या हातातोंडांशी आलेला घास परतीच्या पाण्याने हिरावून घेतला आहे.
शनिवारी मध्यरात्री अचानक वादळी-वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानकपणे या पावसामुळे भोकरंबा, मोटेगाव, मोरवड आदी परिसरातील सोयाबीनच्या उभ्या शेतातील गंजी पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाण्याचा प्रवाहात काही शेतक-यांचे सोयाबीन नाल्याच्या पुरात वाहून गेले. शेतातील काळी माती, वळणे,जमीन अक्षरश: खरडून गेली आहे. सद्या मागील पंधरवड्यापासून भोकरंबा (रेणापूर) परिसरात सोयाबीन काढणीला वेग आला आहे.आवाच्या सव्वा भाव देऊन शेतक-यांंनी आपले सोयाबीन काढून पाण्यात भिजू नये म्हणून गंजी लावल्या होत्या पण या परिसरातील झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे सर्व गंजी पाण्यात उभ्या असल्याचे दिसून येत आहे.