लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांना खरीप २०२३ चा पीकविमा आणि गेल्या दीड वर्षांपासून रखडलेले ठिबक व तुषारचे अनुदान शेतक-यांना अद्यापही सरकारने दिलेले नसल्याने दि. ९ ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना साडी, चोळी व बांगड्याचा आहेर देण्यात आला.
२०२३-२४ या खरीप हंगामामध्ये शेतक-यांनी ठिबक व तुषार संच स्व खर्चाने खरेदी केले. अद्याप तााची सबसीडी शेतक-यांना मिळाली नाही. तर २०२४-२५ ला तर मंजुरीच नाही. शेतकरी मात्र कृषी विभागाकडे चकरा मारत आहेत. हे संच शेतक-यांनी कर्ज काढून घेलेले आहेत. त्यामुळे येणे असलेल्या २१ कोटी रुपयांचे व्याज हे शेतक-यांना भारावे लागत आहे. तसेच गेल्या हंगामातील सोयाबीना पीक विमा १०० टक्के शेतक-यांच्या खात्यामध्ये तत्काळ जमा करावा. ठिकब व तुषार संचाचे अनुदान तसेच शेतक-यांच्या हक्काचा पीक विमा विना विलंब देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनावर सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, राजेंद्र मोरे, नवनथ शिंदे, राजीव कसबे, हिराचंद जैन, दीपक कुलकर्णी, शिवदास पंचाक्षरी, किशन सागावे, राम शिंदे, तानाजी भांजी, विकास राऊत, बालाजी पवार, दीपक आंबेकर, वैजनाथ माडजे, दत्ता ढोले, समाधान गीते, भैरुबा नाईकवाडे, रविंद्र शिंदे, सुरज तडोळे, दत्ता शेळके यांच्या स्वाक्ष-या आहेत.