लातूर : प्रतिनिधी
विलास सहकार साखर कारखान्याची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यानंतर विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल विकासरत्न विलासराव देशमुख मांजर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील, नवनाथ काळे, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर भिसे यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी जाऊन श्रीमती वैशालीताई देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.