25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Home‘सगेसोयरे’साठी सरकारला ३० जूनपर्यंत मुदत

‘सगेसोयरे’साठी सरकारला ३० जूनपर्यंत मुदत

आरक्षण प्रश्नी जरांगे यांच्याशी भुमरे, शंभुराज देसाईंची चर्चा

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आंतरवाली सराटी येथे वाटाघाटी झाल्या. यावेळी मनोज जरांगे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मात्र ३० जूनपूर्वी हा विषय धसास लावा, अशी सूचना केली. दरम्यान, सरकारच्या वतीने १ महिन्याचा कालावधी देण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (गुरूवार) सहावा दिवस आहे. बुधवारी मध्यरात्री बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्व खासदारांना एकत्र करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला. दरम्यान आज संदिपान भुमरे, शंभुराज देसाई यांनी आंतरवाली सराटी येथे जरांगे यांच्याशी चर्चा केली.

बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची दुस-यांदा भेट घेतली. पहिली भेट बीड लोकसभा जिंकल्यानंतर घेतली होती. बुधवारी मध्यरात्री झालेल्या भेटीनंतर सोनवणे यांनी, राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचे सांगून सर्व खासदारांना एकत्रित करणार असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे सोनवणेंनी सांगितले.

दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची कार मराठा आंदोलकांनी बुधवारी अडवली. मराठा आरक्षणासंदर्भात संसदेमध्ये नुसते विषय मांडू नका, सभागृह बंद पाडा, अशी मागणी आंदोलकांनी त्यांच्याकडे केली. जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR