लातूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज प्रा. राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी निवड झाली. या निवडी बद्दल प्रा. राम शिंदे यांचा सत्कार लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान व समस्त धनगर समाजाच्या वतीने आज दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता येथील छत्रपती चौकातील स्वानंद मंगल कार्यालयात होणार आहे.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गणेश हाके राहणार आहेत. स्वागत अध्यक्ष म्हणुन अॅड. अण्णाराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, माजी मंत्री रामराव वडकुते, डॉ. उज्वलाताई हाके, जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, लातूरचे माजी महापौर दीपक सुळ, माजी उपमहापौर देवीदास काळे, माजी नगरसेवीका सपना किसवे, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन दाने, अॅड. निवृत्ती करडे, लहूजी शेवाळे ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते चंद्रकांत धायगुडे आदींची उपस्थिती राहणार आहेत.
या सोहळ्यात डॉ. हनुमंत किणीकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले, कामगार आयुक्त मंगेश झोले, बांधकाम व्यावसायिक विष्णु मदणे, गुंडेराव बनसोडे, चंद्रकांत हजारे, प्रा. डॉ. मधुकर सलगरे, समाज कल्याण सह आयुक्त शिवकांत चिकुर्ते, डॉ. ज्योती सुळ, बालाजी खंडापूरे, धनराज माने, अनिल गोयकर या धनगर समाजातील समाजरत्नांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन हरीभाऊ काळे, अनिल पुजारी, चंद्रकांत खटके, अभिजीत मदने, अनिल गोयकर, प्राचार्य रेखा हाके, हेमा येळे, दत्ता सरवदे यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.
फोटो: ५