सोलापूर—शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल विकास पवार आणि सागर शिंदे यांनी विटंबनात्मक पोस्ट टाकली होती त्याचप्रमाणे रविवारी १० डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आले असता यांच्या बद्दल अपशब्द वापरणे तसेच डोके फोडण्याची भाषा केली असून ह्या पाठीमागे कोणाचे षडयंत्र आहे हे शोधून काढून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
२०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार असून या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांचे दौरे होणार आहेत या समाजकंटकांना वेळीच कडक कारवाई करून कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्याचे काम जबाबदारी शासन व प्रशासन यांच्यावर आहे.उद्धव ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जनतेतून प्रचंड समर्थन मिळत आहे त्यामुळे विरोधकांची पाया खालची वाळू घसरली असून अशा समाजकंटकांना पुढे करून हे घाणेरडे प्रकार करण्याचे षडयंत्र जे कोणी करत आहेत त्याचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात शांतता व सुव्ययवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन अनर्थ ओढावेल.
यापुढे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध कोणतेही कट कारस्थान खपवून घेतले जाणार नाही त्याचे जे गंभीर परिणाम होतील त्यांला संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असा इशारा यावेळी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका जोहरा रंगरेज , उपजिल्हा संघटिका ज्योती माळवदकर , प्रीति नायर ,स्वाती रुपनर ,उपशहर संघटिका सुरेखा वाडकर ,कविता पवार ,माया थोरात ,रेखा राठोड आदी उपस्थित होते.