लातूर : प्रतिनिधी
राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक सामाजिक १० टक्के आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे दिले आहे. सरकारने या घेतलेल्या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी लातूर येथील आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी लातूरात आले होते. त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना तटकरेंनी मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज बांधवाचा शांततेच्या मार्गाने लढा सुरू आहे. मराठा समाज बांधवासाठी राज्य सरकारकडून दोन वेळा आरक्षणासाठी प्रयत्न झाले. न्यायालयात ते आरक्षण टिकले नाही पण परवा राज्य सरकारने कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे. या सरकारच्या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करावे असे आवाहन करून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष महायुती म्हणून लोकसभा निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पर्वास सुरूवात झाली असून बहूतांश जणांचा अजित दादांना पाठींबा मिळत आहे. दादा इतिहास बदलणारे नेते असून त्यांना बारामतीकर स्वीकारतील तसेच सुमित्रा वहीनींनी बारामतीतून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगून त्यांनी लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा निर्णय अथवा महायुतीची चर्चा झाली नसल्याचे सांगत सामंजस्याने जागा वाटपाचा मार्ग काढला जाईल असे ही सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपालीताई पाटील चाकणकर आ. विक्रम काळे युवक नेते सुरज चव्हाण जिल्हाध्यक्ष अफसर शेख शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे आदी उपस्थित होत.े दरम्यान शहरातील अंबाजोगाई रोडवरील हॉटेल अतिथी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन
केले.