29.7 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeलातूरसरपंच पद आरक्षणासाठी २४, २५ एप्रिल रोजी सोडत

सरपंच पद आरक्षणासाठी २४, २५ एप्रिल रोजी सोडत

लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागच्या ५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार  ५ मार्च २०२५ ते  ४ मार्च  २०३० या कालावधीसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातील आरक्षण सोडत देवणी तहसील कार्यालय येथे २५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. तसेच उर्वरित सर्व तालुक्यातील ग्रामपंचायातींसाठी २४ एप्रिल २०२५ रोजी संबंधित
तहसील कार्यालयात आरक्षण सोडत होईल.
लातूर जिल्­ह्यातील १६० सरपंच पदे अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी ८० पदे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २१ सरपंच पदे राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी ११ ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २११ सरपंच पदे राखीव असून यापैकी १०६ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील. तसेच ३९३ ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच राहणार असून यापैकी १९७ ठिकाणी महिलांना संधी मिळेल. एकूण ७८५ पैकी ३९४ ठिकाणी महिला सरपंच राहणार आहेत.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालायामार्फ्त १७ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्­ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच  निवडणूक नियम), १९६४ चे नियम २-अ च्­या पोट नियम (३) व (४) नुसार अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) लातूर जिल्­ह्यातील सर्व तालुक्­यांमध्­ये सरपंच पदे निश्­चीत करून देण्यात आली आहेत. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी  संबंधित उपविभागीय अधिकारी यांना संपर्क प्रमुख म्­हणून नियुक्­त करण्­यात आले असून आरक्षण सोडत संबंधित तहसिलदार कार्यालयात पार पडणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR