सरपंचांवर जीवघेणे हल्ले; ठोस निर्णय घ्या

कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले, अशा घटनांचा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने निषेध केला असून ७ जानेवारीपर्यंत आरोपींना अटक करण्यासाठी डेडलाइन दिली आहे.

तोपर्यंत राज्य सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच मुंबईत धरणे धरतील, असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावच्या माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून त्यांना पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन घटनांबरोबरच राज्यात सातत्याने सरपंचांवर होणा-या जीवघेण्या हल्ल्यांमुळे सरपंच परिषद आक्रमक झाली आहे.

राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक आहे. सरपंचांनी गाव कसा चालवायचा? सरपंच आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी, असा प्रश्न करीत या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी राज्य सरकारकडे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जी. एम. पाटील (आजरा) यांनी केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29
Video thumbnail
Nanded|माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
04:13
Video thumbnail
Ground Report|जिल्हा परिषदेसमोरच वाहतूक नियमांची ऐसीतैशी; पोलिस प्रशासन झोपलंय का?
07:20
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32

Latest news