चाकूर प्रतिनिधी
तालूक्यातील चापोली येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी सामुहीक आत्मदहन सुरू केले होते परंतु लेखी आश्वासना नंतर स्थगित करण्यांत आले आहे. चापोली येथील सार्वजनिक स्मशानभुमी रस्ता प्रकरण गेले अनेक दिवसापासून रखडले आहे. या रस्ता मागणीसाठी याअगोदर दि १६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीसमोर तीन दिवस उपोषण करून अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी व चाकूर येथील तहसीलदार यांच्या मध्यस्थीने तिस-या दिवशी उपोषण सोडण्यात आले.
दहा दिवसात तुम्हाला रस्ता मोकळा करून दिला जाईल, असे लेखी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले पण कसलीही कारवाई प्रशासनाने केली नसल्याने निवेदनकर्ते यांनी चापोली ग्रामपंचायत कार्यालया समोर सरण रचून दि २४ डिंसेबंर रोजी सामुहीक आत्मदहन करण्यांसाठी आले असताना त्यांना ग्रामविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन सामुहीक आत्मदहनापासून परावृत्त केले. यावेळी आंदोलनकर्ते सूर्यकांत शेवाळे, निलेश मद्रेवार, रमेश पाटील, भाऊसाहेब हुलगुंडे, नवनाथ गोरगीळे, गणपत तेलंगे, लक्ष्मण पेटकर, गंगाप्रसाद मद्रेवार, नारायण काचे, युवराज भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी कांही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.