25.5 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeधाराशिवसासुरवाडीत उमेदवारी वाटपात अजित पवार नापास

सासुरवाडीत उमेदवारी वाटपात अजित पवार नापास

मच्छिंद्र कदम
धाराशिव: प्रतिनिधी
जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात जवळपास महायुती व महाविकास आघाडी उमेदवारी वाटपाचे मित्र स्पष्ट झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडी कडून ठाकरे सेनेला दोन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला एक तर काँग्रेसला एक अशा जागा सुटले आहेत. तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटासाठी तीन जागा सुटले आहेत तर भारतीय जनता पार्टीसाठी एक जागा सुटली आहे. महायुती व महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष वगळता इतर प्रमुख पक्षांना जागा मिळाल्या आहेत मात्र राष्ट्रवादी अजित पवार यांचे धाराशिव जिल्ह्यातील सासरवाडी असलेल्या ठिकाणीच एकही उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे अजित पवार हे सासरवाडीत जागा वाटपात एकही जागा न मिळाल्यामुळे ते नापास झाले असल्याचे चर्चा जिल्हाभरात सुरू झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवार पक्षाला हा मतदारसंघ सोडण्यात आला होता. मात्र त्यावेळी ऐनवेळी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा तब्बल तीन लाख २७ हजार मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पराभव केला होता .लोकसभेत धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला जागा मिळाली. मात्र या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश मिळाले नाही. त्यामुळेच की काय अजित पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख असताना त्यांच्या पक्षाला बुद्ध त्यांच्या सासरवाडीत एकही जागा मिळालेली नाही. धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. तसेच घटक पक्ष असलेल्या महायुतीतील सत्ताधा-यांकडून सत्तेतील २० टक्के निधीचा वाटा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना किंवा पदाधिका-यांना मिळत नाही. तसेच इतर कार्यक्रमातही मानसन्मान दिला जात नाही अशी ओरड येथील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून केली जात आहे . त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा हक्काचा एक आमदार हवा आहे. त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उमेदवारी निश्चित होईपर्यंत अजित पवार यांच्या जवळ तळ ठोकून बसले होते .मात्र तरी देखील त्यांना एकही जागा मिळालेली नाही .त्यामुळे जिल्ह्यातील अजित पवार पक्षाचे पदाधिकारी यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे .महायुतीमध्ये घटक पक्षातील ज्यांना उमेदवारी मिळाली त्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार की नाही याबाबत मोठा प्रश्न आहे .हे आगामी आगामी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे .सध्या मात्र अजित दादा यांची सासरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यात तिकीट मिळवण्यात अजित दादा नापास झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
जिल्ह्यात तिकीट मिळवण्यात शिंदे सेना ठरली सरस धाराशिव जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी यामध्ये सर्वाधिक तीन उमेदवारांना शिवसेना शिंदे गट सरस ठरली आहे. महायुतीमध्ये भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत कळम धाराशिव विधानसभा मतदारसंघात अजित इंगळे तर उमरगा लोहारा मतदार संघात आमदार ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी मिळाली आहे. हे तीनही उमेदवार हे शिवसेना शिंदे सेनेचे आहेत ते धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत. यानंतर ठाकरे सेनेच्या तिघांना उमेदवारी मिळाली असली तरी परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत यामध्ये कोण माघार घेणार की दोघेही उभे राहणार हे कळणार आहे .जर राहुल बोटे यांनी माघार घेतली तर ठाकरे शिवसेनेला तीन जागा मिळणार आहेत.

शरद पवार पक्षाला एक जागा मिळणार की त्यांचाही भोपळाच राहणार
धाराशिव जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी मध्ये शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट हे उमेदवारी मिळवण्यात वरचढ ठरले आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाला तुळजापूर विधानसभेची एक जागा मिळाली आहे .तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास पक्षाने राहुल मोटे यांना एबी फॉर्म दिला असला तरी शिवसेना ठाकरे गटाने रंजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या मतदार संघात महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण असा पेच आहे .जर राहुल मोठे यांना उमेदवारी राहिली तर ठाकरे सेनेची एक जागा कमी होऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जिल्ह्यात एक जागा मिळणार आहे .अन्यथा शरद पवार पक्षाला जिल्ह्यात भोपळाच मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR