30.8 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeमुख्य बातम्यासासू, सास-यांनी सुनेला टोमणे मारणे क्रूरता नव्­हे! सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

सासू, सास-यांनी सुनेला टोमणे मारणे क्रूरता नव्­हे! सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सासू आणि सास-­यांनी सुनेला टोमणे मारणे हा कौटुंबिक जीवनाचा एक भाग आहे. याला क्रूरता म्हणता येणार नाही. विशेषत: लग्नाच्या अनेक वर्षांनंतर जेव्­हा दोन्­हींपैकी एक बाजूने घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा अशा प्रकारचे आरोप होतात. याकडे पाहताना न्यायालयाने सावधगिरी बाळगली पाहिजे, असे निरीक्षण नुकतेच सर्वोच्­च न्­यायालयाने नोंदवले.

या सासू आणि सास-­यांवर भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ (पती व त्याच्या कुटुंबियांनी केलेली क्रूरता) अंतर्गत दाखल केलेली तक्रार फेटाळून लावत गुन्हेगारी कारवाई रद्द केली.

‘बार अँड बेंच’ने दिलेल्­या वृत्तानुसार, दाम्­पत्­याचे २००५ मध्­ये लग्न झाले. पतीने मे २०१९ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी समन्स मिळाल्यानंतर तीन दिवसांनी पत्नीने पतीसह सासू आणि सास-यांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप केला. या प्रकरणी पतीसह सासू आणि सास-यांवर भारतीय दंड संहिता कलम ४९८अ (पती व त्याच्या कुटुंबियांनी केलेली क्रूरता) अंतर्गत गुन्­हा दाखल करण्­यात आला. ही कायदेशीर कारवाई रद्द करण्­यात यावी, अशी मागणी करणारी याचिका पतीने गुजरात उच्­च न्­यायालयात दाखल केली होती. मात्र न्­यायालयाने ती फेटाळली. अखेर पतीने सर्वोच्­च न्­यायालयात धाव घेतली.

पतीने दाखल केलेल्­या याचिकेवर न्यायमूर्ती मनमोहन आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने स्­पष्­ट केले की, सासू आणि सास-यांनी सुनेला टोमणे मारणे हा कौटुंबिक जीवनाचा एक भाग आहे. याला क्रूरता म्हणता येणार नाही. विशेषत: वैवाहिक वादांशी संबंधित प्रकरणांमध्ये, विशेषत: लग्नाच्या अनेक वर्षांनंतर जेव्हा एक पक्ष दुस-या पक्षाविरुद्ध घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करतो तेव्­हा आरोप केले जातात. जिथे द्वेषाचे आरोप आहेत, तिथे संबंधित न्­यायालयाने आरोपांमागील हेतू काय आहे? याची चौकशी करावी, असेही सर्वोच्­च न्­यायालयाने स्­पष्­ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR