27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रसाहेब असा अन्याय आमच्यावर पण करा

साहेब असा अन्याय आमच्यावर पण करा

हसन मुश्रीफांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. समरजित घाटगेंनी भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतली. कोल्हापूर दौ-यादरम्यान शरद पवार गटात जाहीर प्रवेश करताना भाषणादरम्यान शरद पवारांनी त्यांना जिंकून देण्याबरोबरच थेट मंत्रिपद देण्यासंदर्भातही भाष्य केले. त्यावर हसन मुश्रीफ यांनी मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत? असा सवाल उपस्थित केला. त्यावर शरद पवारांचे समर्थक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँण्डलवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी अल्पसंख्याक असल्याचा उल्लेख केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये हसन मुश्रीफ यांचा फोटो दिसत असून बाजूला मजकूर लिहिलेला आहे. पवारसाहेबांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अल्पसंख्याक म्हणून केलेला अन्याय बघा, असे म्हणत एक यादीच शेअर केली आहे.

मुश्रीफ यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी शरद पवारांनी कोणकोणती पदं आणि जबाबदा-या दिलेल्या याचा उल्लेख आहे. या यादीत, ‘‘पाच वेळा आमदारकी, चार वेळा मंत्रिपद, वफ्फ बोर्ड, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निर्णयांचे अधिकार, जिल्हा बँकेतील सत्ता, महानगरपालिकेतील सत्ता, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखाने’’ यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले होते की, जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. त्यानंतर पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत? मी पुन्हा म्हणतो की, निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं, समरजित अब तुम्हारी खैर नहीं!’ असे ते यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR