छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र सीईटी सेल विद्यार्थ्यांवर लक्ष्य केंद्रित करत चोरट्यांनी अनोख्या पद्धतीने मोठा आर्थिक फटका दिला आहे. श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज सातारा आणि देवगिरी महाविद्यालय छ. संभाजीनगर परिसरातील २ आणि ३ मे रोजी सीईटी सेलची परीक्षा होती. या परीक्षेसाठी आलेल्या १८ विद्यार्थ्यांच्या दुचाकी आणि चारचाकींच्या डिक्या फोडल्या. तेवढचं नाहीतर, परीक्षेला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या फोनचे सिमकार्ड, एटीएम व क्रेडिट कार्ड चोरले गेले. ही चोरी चोरट्यांनी अवघ्या तासाभरात केली असून विद्यार्थ्यांना ९ लाखांचा गंडा घातला.
फक्त सिमकार्ड व कार्ड्सच चोरले
या चो-यांमध्ये एक विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी मोबाईल फोडून त्यामधील सिमकार्ड, एटीएम व क्रेडिट कार्ड काढले. मोबाईल तसाच फेकून दिला. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परतल्यावर त्यांना त्यांच्या फोनमधील सिम गायब असल्याचे लक्षात आले. काही विद्यार्थ्यांनी सिम बंद करून खात्यातील हालचाल तपासली असता, पैसे गायब झाल्याचे लक्षात आले.
सिमकार्ड आणि कार्ड्स चोरल्यानंतर ‘फरगेट पिन’ पर्यायाचा वापर करत नवीन पिन निर्माण केला.
नवीन पिनच्या साहाय्याने एटीएममधून रोख रक्कम काढली क्रेडिट कार्डद्वारे मॉलमध्ये व ऑनलाइन खरेदी करत एका तासात ५५ हजारांचे कपडे खरेदी केली.
चोरट्यांना परीक्षा केंद्रावर वेळेची माहिती आधीच माहिती असल्याचे समजते आहे. परीक्षा देणारे काही विद्यार्थी नोकरी करणारे त्याच्या खात्यामध्ये बरीच रक्कम होती. ही चोरी सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणाबद्दल माहिती उस्मानपूरा आणि सातारा पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा सायबर सेल करत आहे.