20.6 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeराष्ट्रीयसॅटेलाइट स्पेक्ट्रमचा लिलाव नाही

सॅटेलाइट स्पेक्ट्रमचा लिलाव नाही

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली : भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँडसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव होणार नाही. त्याचे नियामकाने निश्चित केलेल्या ठराविक दराने वाटप होईल, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी स्पष्ट केले.
शिंदे म्हणाले की, प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे पालन करावे लागते. ही संघटना अंतराळ किंवा सॅटेलाईट स्पेक्ट्रमचे धोरण ठरविले.

आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सॅटेलाइट किंवा अंतराळातील स्पेक्ट्रमचा लिलाव केला जात नाही. जगात कोणत्याही देशात लिलावाद्वारे या स्पेक्ट्रमचे वाटप होत नाही. सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्ट्रम हे मोफत मिळणार नाही. दूरसंचार नियामक ट्राय त्याचे दर निश्चित करेल आणि त्यानंतर विक्री होईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

भारतात काही कंपन्या या स्पेक्ट्रमचे वाटप लिलावाद्वारे व्हावे, अशी मागणी करीत आहेत. ठराविक किमतीत वाटप केल्यास या क्षेत्रात असमतोल निर्माण होईल असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR