21.4 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रसैतानी बहुमताने शुक्लांची वापसी

सैतानी बहुमताने शुक्लांची वापसी

मुंबई : प्रतिनिधी
रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याने संजय राऊत यांनी सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली आहे. ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला असून, सैतानी बहुमत असलेल्या सरकारमुळे अशा घटना घडत असल्याचे राऊत म्हणाले. विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी हे सर्व घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे महासंचालकपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये निवडणूक काळापुरतीच त्यांची बदली केल्याचे म्हटले होते. खरे म्हणजे असे होत नाही. रश्मी शुक्ला यांच्या नेमणुकीबाबत वाद आहे. अडीच वर्षांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारे त्यांची नेमणूक झाली आणि आताही होईल. भविष्यामध्ये अशा बेकायदेशीर बदल्या आणि नियुक्त्या होत राहतील, त्या आपल्याला सहन कराव्या लागतील. कारण सैतानी बहुमत मिळालेले सरकार महाराष्ट्रावर लादण्यात आले आहे. बहुमत लोकशाही मार्गाने आलेले नसून असंख्य घोटाळे, पैसे आणि यंत्रणांचा वापर करून मिळाले आहे.

येणा-या सरकारवर कोणत्ेही नियंत्रण नसेल, हे बेफाम सरकार असेल. त्याच्यामुळे रश्मी शुक्लांसह अन्य कोणाच्या नेमणुका होतील यावर बोलणे म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेतल्यासारखे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारला प्रश्न विचारावे लागतील, जिथे सरकार चुकत आहे तिथे बोट दाखवावे लागेल. मुंबई असेल, दिल्ली असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरही आम्हाला प्रश्न विचारावे लागतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अदानी यांच्याविरोधात बोलायला सुरुवात करण्याआधी राज्यसभा सभापतींनी सभागृह बरखास्त केले. जर महाराष्ट्राच्या विधानसभागृहात अशी हुकूमशाही दिसली तर जनतेने आम्हाला ताकद दिली आहे, आम्ही लढत राहू, असे संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR