27.2 C
Latur
Wednesday, May 7, 2025
Homeलातूरसोने खरेदीकडे ४० टक्के नागरिकांची पाठ

सोने खरेदीकडे ४० टक्के नागरिकांची पाठ

लातूर : प्रतिनिधी
अक्षय तृतीयेला सोने खरेदीला विशेष महत्व असते. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने आणि सोन्याच्या दागीन्याची विशेष खरेदी केली जाते. या दिवशी सराफा बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते मात्र गतवर्षाच्या तूलनेत यंदा सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने अक्षय तृत्तीयेच्या मूर्हतावर जवळपास  ३० ते ४० टक्के नागरीकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे व्यापारी हणूमंत वाघ यांनी सागीतले.
वैशाख महिन्यातील शुक्लपक्षात येणा-या या सणाचा मुहूर्त हिंदू आणि जैन धर्मियांसाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी बरेचजण शुभ कार्याची सुरुवात करतात. त्यामुळे सोनेखरेदीही केली जाते. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यामुळे घरामध्ये समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही सराफा बाजारात नागरिकांनी सोने खरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. मात्र गतवर्षाच्या तूलनेत यंदा जवळपास ३० ते ४० टक्के नागरीकांनी सोने खरेदी केली नसल्याचे व्यापारी हणुमंत वाघ यांनी सागीतले. मागील काहि दिवसापासून सराफा बाजारपेठेत मोठी उसळी झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांनी सोने-चांदी खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे. अवघ्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात माठी वाढ झाली आहे. यात शहरातील सराफा बाजापेठेत दि. ३० एप्रिल रोजी सोने २४ कॅरेट ९६३०० रूपये प्रति १० गॅ्रम तर २२ कॅरेट सोने ८९ हजार २०० रूपये प्रति १० ग्रॅम विनाजीएसटीचा दर मिळाला तर चांदीला ९९ हजार ५०० रूपयांचा दर विनाजीएसटी मिळाला आहे.
शहरातील बाजारपेठेत पारंपारिक बाजाराप्रमाणेच पोहेहार, मोहनमाळ, गोफ, बांगड्या, पाटल्या, शाहीहार, गोठ आदी दागीन्यांची फॅशन पुन्हा एकदा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. सणासुद्दीला तसेच अश्वाश्वत स्थितीत ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदी खरेदीकडे कल असतो. मागील काहि दिवसापासून सराफा बाजार चढा राहिल्याने ग्राहक सोने खरेदीकडे म्हणावे तसे वळत असल्याचे कन्या ज्वेलर्सचे संचालक हणुमंत वाघ यांनी
सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR