24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रस्ट्रॉबेरीच्या मळ्यांनी बहरले महाबळेश्वर

स्ट्रॉबेरीच्या मळ्यांनी बहरले महाबळेश्वर

सातारा : महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी जगप्रसिद्ध आहे. पावसाळा संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. परंतु अति पावसाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. एरवी सप्टेंबरमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते परंतु यंदा ऑक्टोबर महिन्यात लागवड सुरू आहे.
महाबळेश्वर आणि जावळी या तालुक्यांमध्ये स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात महाबळेश्वर, वाई, कोरेगाव, सातारा, जावळी या तालुक्यांमध्ये बहुतांश जोरदार पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात अगदी कमी प्रमाणात लागवड झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडीप देताच लागवडीला सुरुवात झाली होती. आत्तापर्यंत ८० टक्के लागवड झाली असून उर्वरित लागवड जोरदार पद्धतीने सुरू आहे. सुरुवातीच्या काळात लागवड झालेली स्ट्रॉबेरी ही नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून ग्राहकांना मिळणार आहे. तर डिसेंबरमध्ये नाताळच्या कालावधीत पूर्ण क्षमतेने ग्राहकांना स्ट्रॉबेरी उपलब्ध होणार आहे. तसेच त्यातून चांगला फायदा होईल अशी शेतक-यांना अपेक्षा आहे.

२००० एकरावर स्ट्रॉबेरीची लागवड
सातारा जिल्ह्यात विविध देशांतून तब्बल १६ लाख मदरप्लांटची आयात करण्यात आली आहे. आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये दोन हजार एकरवर स्ट्रॉबेरीची लागवड झाली असून आणखी ७०० एकरवर लागवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवाळीच्या कालावधीमध्ये फळांचे दर कोसळले होते. त्याचा तोटा हा फळ उत्पादक शेतक-यांना सहन करावा लागला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR