23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeराष्ट्रीयस्पॅडेक्स मिशनचे यशस्वी लाँचिंग

स्पॅडेक्स मिशनचे यशस्वी लाँचिंग

इस्रोने रचला इतिहास, चांद्रयान-४ सारख्या मोहिमांना मदत होणार
श्रीहरीकोटा : वृत्तसस्था
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो येथे अवकाश डॉकिंग एक्सपेरिमेंटचे (स्पॅडेक्स) आज रात्री सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र येथून ३० डिसेंबर २०२४ रोजी पीएसएलव्ही रॉकटेसह यशस्वी लाँचिंग केले.

इस्त्रोचे स्पॅडेक्स मिशन पीएसएलव्हीद्वारे लाँच केले. अवकाशातील डॉकिंगच्या प्रदर्शनासाठी प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आला. इस्त्रोच्या माहितीनुसार स्पॅडेक्स मिशनचा प्राथमिक उद्देश पृथ्वीच्या वृत्ताकार कक्षेत अवकाश यानांचे एकत्र येणे, डॉकिंग, अनडॉकिंगबाबत माहिती मिळवणे हा आहे.

इस्त्रोने आजचे यश भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमातील महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. छोटा आकार आणि कमी वस्तुमानाच्या आकामुळे स्पॅडेक्स आव्हानात्मक आहे. दोन मोठ्या अवकाश यानाना डॉक करण्याच्या तुलनेत मिलन आणि डॉकिंग युद्ध सराव यासाठी आणि डॉकिंगचा अभ्यास अधिक सूक्ष्म पद्धतीने करण्याची गरज आहे. हे मिशन पृथ्वीवर जीएनएसएसच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. चांद्रयानसारख्या मोहिमांना यशस्वी करण्यासठी स्पॅडेक्स फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले.

या मोहिमेमुळे भारताला अंतराळात दोन उपग्रहांदरम्यान डॉकिंग, अनडॉकिंग करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. अंतराळातील दोन उपग्रह किंवा उपकरणे जोडून नवीन रचना तयार करण्याच्या या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. यातून जगात अंतराळ संशोधनात अशी मजल गाठणारे भारत चौथे राष्ट्र ठरणार आहे, याचाही भारतीयांना सार्थ अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अवकाश कार्यक्रमातील
महत्त्वाचे पाऊल
स्पॅडेक्सचे यशस्वी लॉंचिंग भारत अवकाश कार्यक्रमातील महत्त्वाचे पाऊल आहे. स्पॅडेक्स कक्षेत डॉकिंगमध्ये भारताची क्षमता स्थापन करणे आव्हान होते. ही मानवयुक्त अंतराळ यान आणि उपग्रहीय सेवा योजनांसाठी महत्त्वाचे तत्रज्ञान आणि पद्धत आहे.

भारत चार देशांच्या यादीत
अवकाशात डॉकिंग या एक किफायतशीर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन मिशन पाहायला मिळते. भारत सध्या चीन, रशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या पंगतीला बसलेले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR