14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeलातूरहरंगुळ व भोईसमुद्रगा रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

हरंगुळ व भोईसमुद्रगा रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची नुकतेच हरंगुळ व भोईसमुद्रगा येथील नागरिकांनी भेट देऊन कळंब रस्ता खराब झाला आहे. यामुळे ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे, तरी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची विनंती केली होती. नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेऊन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी ३१ डिसेंबर रोजी स्वत: या ठिकाणी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली होती आणि संबंधित अधिका-यांना काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. दि. ४ जानेवारी रोजीपासून रस्त्याची दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरु झाले आहे.
याबाबत संदर्भाने बोलताना, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ शकत नाही.  रस्त्यांची दुरुस्ती ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेऊन  तात्काळ कारवाई केली आहे. लवकरच हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त होईल आणि नागरिकांना सुलभ प्रवास करता येईल असे सांगीतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR