मुंबई : प्रतिनिधी
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आली आहे, हे नक्की काय चालले आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणे आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणे हे विचित्र आहे.
प्रतिनिधी महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाचं गु-हाळ काही संपता संपत नाही. ब-याच काळाने पालकमंत्रिपद जाहीर झाले. त्यातही काही मंत्र्यांची इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे अगदी आयत्यावेळी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाली. यावरून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.