औसा (प्रतिनिधी )-
: औसा तालुक्यामध्ये सायंकाळ च्या सुमारास सुसाट्याच्या वारासहसीत जोरदार पावसाचे आगमन झाले तालुक्यातील हासेगाववाडी शिवारात झाडाखाली बसलेल्या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने एक जणांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून जखमीला तात्काळ लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले ही घटना रविवार दि. 23 जून रोजी सायंकाळीच्या सुमारास घडली आहे..
याबाबत माहिती अशी रविवारी पाच सुमारास तालुक्यातील अनेक भागात विजेचा कडकडाटा सह पाऊस झाला यात हसेगाववाडी ता औसा येथील दोन शेतकरी पावसामुळे एका झाडाचा आसरा घेऊन बसले होते याच वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि यातील श्रीपती आत्माराम मदने (वय 32)यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा सोबत असलेला दुसरा शेतकरी महादेव प्रकाश मुगळे (वय 38)हा गंभीर जखमी आहेत हे दोघेही हासेगाववाडी येथील आहेत दरम्यान यातील जखमीला तात्काळ लातूरला शासकीय रुग्णालय येथे हालवण्यात आले आहे..