बोरी : येथून जवळच असलेल्या वर्णा येथे खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य हॉलीबॉल स्पर्धेत बोरी येथील वसीम भैया मित्र मंडळाच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय पारितोषिक नांदेड येथील नांदेड युनिव्हर्सिटी तर तृतीय पारितोषिक बोरी येथील ओमकार भैया चौधरी मित्र मंडळाने मिळवले.
जिंतूर तालुक्यातील वर्णा येथे दरवर्षी खंडोबा यात्रेनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात केल्या जाते. यावर्षी गावातील वसंत फाटे, अनंता अंभूरे, कृष्णा अंभूरे, लक्ष्मण अंभूरे, गणेश अंभूरे या तरुणांनी पुढाकार घेऊन हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन गावातील शकुंतलाबाई कदम बोर्डीकर महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.५ डिसेंबर रोजी केले होते.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजयराव भांबळे मित्र मंडळ वर्णाच्या वतीने १५५५५, द्वितीय पारितोषिक सिनेट सदस्य इंजि. नारायणराव चौधरी यांच्या वतीने १११११ तर तृतीय पारितोषिक संदीप भैय्या अंभूरे यांच्या वतीने ५५५५ याशिवाय उत्कृष्ट शूटर पारितोषिक बालाजी अंभूरे यांच्यावतीने ११११ विजेत्या संघाला व खेळाडूंना देण्यात आले.
या स्पर्धेत पंच म्हणून अच्युतराव अंभूरे, दामोदर अंभूरे, काशिनाथराव अंभूरे, प्रसादराव अंभूरे, अमृतराव अंभूरे, चतुर अंभूरे, वैभव अंभूरे, भगवानराव अंभूरे, अक्षय अंभूरे यांनी काम पाहिले. वसीम भैया मित्र मंडळाचे अध्यक्ष बाबू पठाण व संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन मित्र मंडळाचे संस्थापक शेख वसीम, संघाचे मार्गदर्शक शेख नदीम तसेच संघाचे प्रशिक्षक शेख शारेक, शेख अलीम यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.