शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ ते होनमाळ रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रोडवर खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने प्रवास तसेच पायी चालणेही कठीण झाले आहे. परिणामी या दुरुस्तीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून रस्त्यावर बेशरमाचे झाड लाऊन बुधवारी शेतक-यांंनी आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गेल्या अनेक वर्षांपासून या होनमाळ रस्त्यावरील खडी उखडून गेली आहे. त्यात मोठे खड्डे पडल्याने प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. खड्यातील पाण्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहे. याबाबत होनमाळ ग्रामपंचायत, होनमाळ ग्रामस्थ व या रस्त्यावरील शेतकरी यांनी अनेक वेळा प्रशासनाला माहिती देऊनसुद्धा हा रस्ता दुरुस्त केला नाही. या शिरूर अनंतपाळ होनमाळ रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, या मागणीसह
प्रशासनाचे यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतक-यांंनी रस्त्यावर बेशरमाची झाडे लाऊन आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी गुरंिलग डिगोळे, विश्वनाथ हांद्राळे, महेश व्यवहारे, शिवदास उंबरगे, बाबुराव बर्गे, तानाजी वलांडे, येरोळे, संभाजी पारशट्टे, पप्पु धुमाळे, बसवराज मठपती, महादेव आवाळे, अशोक कोरे, व्यकंट हांद्राळे, सतीश शिवणे, होनमाळ चे सरपंच हरणे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.