लातूर : प्रतिनिधी
लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या वतीने रेणापूर तालुक्यातील खरोळा शाखेअंतर्गत असलेल्या सेलू व धवेली विविध कार्यकारी संस्थानी बँक स्तरावर १०० टक्के वसुली केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव व्यंकटराव चित्ते, व्हाईस चेअरमन बालासाहेब बोंबडे, धवेली संस्थेचे चेअरमन माधवराव हणमंत चंबूले, गटसचिव दिपक अंधारे, खरोळा शाखेअंतर्गत येणा-या खरोळा विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन सुधाकर काळे तळणी, ज्ञानोबा आरदवाड, कुंभारवाडी चेअरमन सुग्रीव शेवाळे यांच्यासह सोसायटी संचालक मंडळांचा लातुर जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला
यावेळी तालुका फिल्ड ऑफिसर व्ही. ए. देशमुख, तपासनीस प्रमोद पवार, शाखा
व्यवस्थापक विकास चोथवे, विठ्ठल सरवदे, तुकाराम कस्तुरे, सुदर्शन भोपी, गट सचिव संजय वलंमपल्ले, शिवगीर गिरी, अजय चक्रे, विजय एकुर्गे, तंटामुक्ती अध्यक्ष खरोळा हणमंत राऊतराव यांच्यासह आदी उपस्थित होते.