23.9 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeलातूर१०२ विशेष शिक्षक सेवेत कायम होणार !

१०२ विशेष शिक्षक सेवेत कायम होणार !

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्र स्तरावर दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी २००५ मध्ये १०२ कंत्राटी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. अल्प मानधनात वाडी, तांडे, शाळेवर काम करणा-या कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षापासून मानधनावर काम करणा-या शिक्षकांना लवकरच कायम शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार असल्याने या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या १ हजार २७४ शाळेतील १०२ केंद्रावर २००५ साली समग्र शिक्षा अंतर्गत १०२ दीव्यांगांसाठी काम करणारण्यासाठी विशेष शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने अल्प मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्यात गेल्या २० वर्षापासून वाडी, तांडे, शाळावर काम करणारे कंत्राटी विशेष शिक्षक अल्प मानधनात काम करत होते. राज्यातील ३१०२ दिव्याग साठी काम करणा-या शिक्षकांना शासन सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दि. ३० सप्टेंबर रोजीच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला. यामध्ये लातूर जिल्ह्यातील एकात्म शिक्षण मधील २ माध्यमिक शिक्षणाचे ३ व समग्र शिक्षातील १०२ दिव्यांग साठी काम करणा-या विशेष शिक्षकांना लाभ होणार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत व अत्यल्प मानधनावर दिव्यांगासाठी काम करणारे कर्मचारी दिव्यांगांच्या सेवेत कायम लवकरच कायम होणार आहेत.

तालुका विशेष तज्ञ २४ विशेष शिक्षक ७५ व जिल्हा समन्वयक ३ यांचा कायम मध्ये सहभाग होणार आहे. सदर निर्णय घेण्याकरता शासनाने सर्वोच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिव्यांग मुलांकरता विशेष शिक्षक पदनिर्मिती शासनाने करून प्रत्येक शाळेवर विशेष शिक्षक नेमणूक करावा असा आदेश दिलेला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. शासनाने सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यात ४ हजार ८६० विशेष शिक्षकांच्या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी वेळोवेळी मागणी लावून धरली. याबाबत जिल्हा समन्वयक सतीश भापकर, जिल्हा समन्वयक अंगद महानुरे, जिल्हा समन्वयक सुनील राजुरी व विशेष शिक्षक सचिन वळके, सर्व कर्मचारी यांनी आभार मानले आहेत. या निर्णयामुळे कर्मचा-यांमध्ये आनंद पसरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR