26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूर१२ लाखांचे चंदन; साडेपाच लाखांचा गुटखा जप्त 

१२ लाखांचे चंदन; साडेपाच लाखांचा गुटखा जप्त 

लातूर : प्रतिनिधी
पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १५ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी कारवाई करीत औसा येथून १५२ किलो चंदन व वाहनासह १२ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील दोघांना पाठलाग करुन पकडले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.  तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ लाख ५८ हजार ४८५ रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात  दि. १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून बार्शी येथून औसाकडे जाणा-या हायवेवर एमएच १४ एएम ६६७७ या गाडीचा पाठलाग करून औसा येथे पकडण्यात आले. गाडीची तपासणी केली असता गाडीत वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेला चंदनाचा गाभा व  लाकडे मिळून आली.
 या पथकाने  १५२ किलो चंदन व वाहनासह १२ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केले. या गाडीतील अशोक दिलीप कदम वय ३० वर्षे रा. येळंब ता. बार्शी व मारुती जेटीबा पवार वय ५० रा. इंदिरानगर औसा या दोघांना ताब्यात घेतले तर तानाजी सुरवसे रा. सावरगाव तालुका बार्शी हा पळून गेला.  विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन औसा येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, पोलीस अमलदार युसुफ शेख, चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव,प् ोलीस स्टेशन औसाचे पोलीस अमलदार वाडकर, सूर्यवंशी यांनी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १५ डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही करत लाखो रुपयांचा गुटखा व हातभट्टी देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणा-यावर कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीमधून एमएच ०४ जी. झेड ४६४ या क्रमांकाच्या कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत असलेला गुटखा व सुगंधित पानमसाला, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार, असा एकूण ५ लाख ५८ हजार ४८५ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी असलम अकबरखॉ पठाण वय ३९ वर्षे रा. साई रोड लातूर, आसिफ बशीर सय्यद वय ३३ रा. सोहेलनगर लातूर यांना ताब्यात घेतले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR