पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर पुस्तक महोत्सव होणार आहे. महोत्सव घराघरात पोहोचावा यासाठी विविध जाहीर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सर्वात महत्त्वाचा उपक्रम शांतता… पुणेकर वाचत आहे.
या उपक्रमात शहरातील प्रत्येकाने या ठरलेल्या वेळेत, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले पुस्तक वाचायचे असून, वाचनासाठी प्रेरणा इतरांनाही द्यायची आहे.या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये, खासगी विद्यापीठे, संशोधन संस्था, सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालयांमध्ये उत्साहात साजरा होणार आहे. वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी पुण्यातील सरकारी आणि खासगी कार्यालये, आस्थापने यांनी उस्फुर्तपणे उपक्रम नोंदवावा, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.