16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूर२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन

२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील लातूर तालुक्यातील सुमारे २ कोटी २० लाख रुपयांचे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भुमिपजन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या विकासकामामुळे नागरिकांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त्त केले.
लातूर तालुक्यातील कासारखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत पेव्हर ब्लॉक रस्ता (१५ लक्ष) व संजय खंडागळे ते त्र्यंबक शिंदे यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक रस्ता (१० लक्ष) या कामांचा शुभारंभ आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. कासारखेडा येथील सोहळ्यानंतर चिकलठाणा येथे स्थानिक आमदार निधीतून झालेल्या महादेव मंदीर ते  प्रताप पाटील यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्ता (१० लक्ष), बारा ईमाम मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक (७ लक्ष), चिकलठाणा ते पांढरी रस्ता मातीकाम व मजबुतीकरण (२४ लक्ष), दलित वस्तीत २५ केव्हीए क्षमतेचा नवीन डीपी आदी विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.  सलगरा खु. येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या अंबाबाई मंदिरासमोरील सभागृह (७ लक्ष), दलित वस्तीतील पेव्हर  ब्लॉक (१० लक्ष), झोपडपट्टीवरील दलित वस्तीमधील पेव्हर ब्लॉक व नाली काम (१० लक्ष), दलित वस्तीतील विद्युतीकरण (५ लक्ष) आदी कामांचे आमदार धिरज  देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
येथील खंडोबा मंदिरासमोरील खुल्या जागेत सभागृह (१० लक्ष) उभारले जाणार असून याच्या बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.  शिवणी खुर्द (ता. लातूर) येथील नूतन ग्रामपंचायत इमारत (२० लक्ष), मनरेगांतर्गत पेव्हर ब्लॉक रस्ता (१० लक्ष), श्री. मुसा शेख यांचे घर ते  सिकंदर शेख यांच्या घरांपर्यंत नाली बांधकाम (१० लक्ष), दलित वस्तीतील पेव्हर ब्लॉक रस्ता (१४ लक्ष), पाणंद रस्ता (३६ लक्ष), जलजीवन अंतर्गत पाईपलाईन काम आणि चामेवाडी येथील नवीन विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. वसंत शिंदे यांचे घर ते श्री हनुमान मंदीर ते श्री माधवराव लातुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नालीकाम करणे (१० लक्ष), मनरेगातून गावांतर्गत सिमेंट रस्ता (१० लक्ष) या कामाचे भूमिपूजनही त्यांनी केले.
यावेळी प्रमोद जाधव, सुभाष घोडके, अनुप शेळके, राजकुमार पाटील, सुनील पडिले, दगडूसाहेब पडिले, प्रवीण पाटील, प्रतापराव पाटील, बालाजी वाघमारे, रघुनाथ शिंदे, श्रीकांत बैले, नंदकुमार देशमुख, पंडित ढमाले, शंकर बोळंगे, बळवंत पाटील, आबासाहेब देशमुख, महेश जाधव, महेंद्र देशमुख, बाबासाहेब पाटील, परमेश्वर पाटील, उत्तम बनसोडे, ग्रामसेवक उषा दुभते, लिंबराज पाटील, पंडित गायकवाड, परमेश्वर बावलगे, सलगरा खुर्दच्या सरपंच श्रीदेवी कांबळे, शंकर पाटील, कमलाकर अनंतवाड, बालाजी मनदुमले, भालचंद्र जाधव, युवराज जाधव, मुकेश जाधव, शिवणीचे सरपंच बाळू गायकवाड, उपसरपंच हरिपाल मोरे, ज्ञानोबा गवळे, सिध्देश्वर स्वामी, सरवर शेख, महावितरणचे कनिष्ठ  अभियंता ओंकार तारळकर, वरिष्ठ तंत्रज्ञ सतिश गिरी, सुधाकर साठे, गणपत कल्लेकर, एकनाथ जाधव, दत्ता फड, बालाजी बालणे यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR