37.4 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeलातूर३० एप्रि­लपर्यंत गुंठेवारीला मुदतवाढ

३० एप्रि­लपर्यंत गुंठेवारीला मुदतवाढ

लातूर : प्रतिनिधी
शहर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत व हस्तांतरित झालेले भूखंड विकास नियमाधीन करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यास दि. १६  ते ३० एप्रि­लपर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधितांनी याची दखल घेत असे प्रस्ताव दाखल करावेत,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील विकास नियमाकुल बाबत गुंठेवारी लागू करण्यात आली होती.त्यानुसार शहर हद्दीतील नागरिकांना आपले हस्तांतरित झालेले व अनधिकृत भूखंड नियमाधीन करण्याची संधी देण्यात आली होती. याची मुदत  दि. १५ एप्रिल रोजी संपली आहे.विहीत मुदतीत प्रस्ताव दाखल करणे अनेकांना शक्य झाले नाही. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक गुंठेवारीचा लाभ घेण्यापासून वंचित राहिले होते.ही बाब लक्षात घेता मनपाने १६ एप्रि­ल ते ३० एप्रि­लपर्यंत मुदत वाढ दिली आहे.
महानगरपालिका हद्दीतील महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण ) सुधारीत अधिनियम २०२१ व तसेच लातूर शहर हद्दीतील सद्यस्थितीत मंजूर विकास योजना (सु+वा.क्षे.) प्रमाणे अनाधिकृत भूखंड, हस्तांतरित झालेले भुखंड व  गुंठेवारी विकास नियमाधीन करण्यासाठी नागरिकांनी प्रस्ताव दाखल करून घेवून नियमीत करावेत असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR