27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूर३३ लाख रुपयांचा गुटखा जप्त

३३ लाख रुपयांचा गुटखा जप्त

शिरूर अनंतपाळ :  प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्नाटकातून राज्य सीमा पार करून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला पानमसाला व सुगंधी पान मसाला चोरट्या मार्गाने वाहतूक करणा-यावर शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ३३ लाख २ हजार ५०० रुपयांचा गुटखा पकडला आहे.शिरूर अनंतपाळ पोलीसांची या महिन्यातील गुटखा पकडण्याची दुसरी मोठी कार्यवाही आहे.
       पोलीस निरीक्षक दराडे यांना खब-यामार्फत कर्नाटकातुन साकोळ मार्ग परळी येथे दोन फोरव्हिलर गाड्यातून पानमसाला गुटखा घेऊन जात असल्याची खबर मिळाल्यामुळे दराडे यांनी उपनिरीक्षक गजानन अन्सापूरे व पोलीस कर्मचा-यांचे पथक तयार करून पांढरवाडी पाटीकडे पाठविले. साकोळ येरोळ दरम्यान पांढरवाडी  पाटी येथे दि.१९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता इनोव्हा कार व दुसरी स्कॉरपीओ अशा एका मागून एक दोन वाहने सुसाट वेगाने साकोळकडून येरोळ कडे जात होते. त्या दरम्यान पथकातील पोलीस कर्मचा-यांनी गाडी थांबवून तपासणी केली असता दोन्ही गाड्यात जवळपास ११ लाख २ हजार ५०० रुपयांचा प्रतिबंधीत सुगंधी पान मसाला, गुटखा आढळून आला.  याप्रकरणी परळी येथील दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन कार आणि गुटखा असा मिळून ३३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक गजानन विजय अन्सापुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरबाज खरुल्ला खान, वसीम मुक्ररमखान यांच्या विरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात भाग १ ते ५ गुन्हा रजि . नं. २२१ / २४ कलम १२३ , २२३ , २४७ , २७५ , ३ ( ५ ) बी एन एस अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापूरे , पो . अंमलदार शिवकुमार बिराजदार, पोलीस अंमलदार विकास लोखंडे , संदीप टिपराळे , चालक किशोर खांडेकर यांनी सापळा रचून केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR